Share

शर्मा-रहाणेच्या जोडी कडून भारतीय संघाच्या अपेक्षा भंग

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 3 बाद 99 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती परंतु राहणे अवघ्या सात धावतच तंबूत परतला. राहणे आउट झाल्यानंतर पंत रोहितची साथ द्यायला मैदानात आला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना आज (दि. २४ फेब्रुवारी) आहे. या कसोटीचे दोन खास वैशिष्ट्ये आहेत. हा डे-नाईट कसोटी सामना असून गुलाबी चेंडूने खलवण्यात येईल. दुसरं म्हणजे सामन्याचे आयोजन जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी (मोटेरा) स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या स्टेडियममध्ये हा पहिलाच सामना खेळवला जात आहे.

इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाचा इंग्लंडला पश्चाताप होईल अशी स्थिती भारतीय गोलंदाजांनी केली. सुरुवातीपासूनच एका मागोमाग एक धक्के बसलेल्या इंग्लंडकडून झॅक क्रॉली ( ८४ चेंडूत ५३ धावा ) वगळता कोणालाच चांगली कामगिरी करता आली नाही. अक्सर पटेलने निम्म्याहून अधिक म्हणजेच ६ बळी घेत इंग्लंडच्या संघाला सुरुंग लावला. यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात ११२ धावांमध्ये भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण घातले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!