मुंबई – एकीकडे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान सुरू झालेले असतानाच दुसरीकडे कोरोना रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांमुळे रुग्ण पुरते हवालदील झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उपचार घ्यायला गेलेले रुग्ण सुरक्षित आहेत कि नाही असा सवाल उपस्थित करण्यासारखी परिस्थिती गेल्या काही दिवसात घडत असलेल्या घटनांमुळे निर्माण झाली आहे.
दोनच दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचां प्राम गमवावे लागल्यानंतर आज विरारमधील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली. या घटनेमध्ये १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.विरार पश्चिम इथल्या विजय वल्लभ रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत रुग्णालयातील 17 रुग्ण अडकले होते. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आणि त्यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी या सर्व प्रकारानंतर राज्यसरकारवर तोफ डागली आहे. जवळपास वर्षभरापुर्वी भंडारा अग्नीकांडानी ११ निष्पाप बालकांचा जीव घेतला….त्यावेळी सर्व रूग्णालयांचं फायर ऑडीट करू ही सरकारची घोषणा त्यानंतर भांडुप घटना १० जण दगावले नाशिक घटना….२२ जण दगावले नाशिक धगधगतं असतांनाचं काल विरार अग्नीकांड घडलं… घोषणेचं काय झालं असा सवाल त्यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे.
जवळपास वर्षभरापुर्वी भंडारा अग्नीकांडानी ११ निष्पाप बालकांचा जीव घेतला….त्यावेळी सर्व रूग्णालयांचं फायर ऑडीट करू ही सरकारची घोषणा
त्यानंतर
भांडुप घटना १० जण दगावले
नाशिक घटना….२२ जण दगावले नाशिक धगधगतं असतांनाचं
काल विरार अग्नीकांड घडलं…
घोषणेचं काय झाल @CMOMaharashtra— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 23, 2021
दरम्यान, भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी देखील ठाकरे सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भंडारा, भांडुप, नाशिक येथील घटनांमधून राज्य सरकारने कोणताच धडा घेतला नाही असं त्यांनी म्हटले आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. रुग्णालयाचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट यांची त्वरित चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी देखील त्यांनी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित
- धक्कादायक बातमी : ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
- राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण – उदय सामंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

