नवी दिल्ली- देशभरात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. यातच आता वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिलपासून सुरु झालेली यावर्षासाठीच्या अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती अमरनाथ मंदिर समितीनं ट्विटर संदेशात दिली आहे.
या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीवर मंदिर समिती लक्ष ठेवून आहे, परिस्थितीत सुधारणा झाल्यावर ही नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाईल, असं या संदेशांत म्हटलं आहे. 56 दिवसांची ही यात्रा यावर्षी 28 जून ते 22 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
दरम्यान, देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उच्चस्तरीय बैठका घेणार आहेत. या बैठकांसाठी त्यांनी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आखलेला पश्चिम बंगालचा आजचा दौराही त्यांनी रद्द केला आहे.
आज सकाळी एका अंतर्गत बैठकीत प्राथमिक आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी हे कोरोना संसर्गाची बिकट स्थिती असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूर दृश्य प्रणालीद्वारे चर्चा करणार आहेत. यानंतर ते दुपारी, देशातील आघाडीच्या ऑक्सिजन उत्पादकांशीही बोलणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून विरार घटनेच्या चौकशीचे आदेश
- देवदत्त पड्डिक्कलची दमदार खेळी ; केला ‘हा’ विक्रम आपल्या नावे
- #Virar : रुग्णांच्या नातेवाईकांना 5 लाखाची राज्य सरकारने मदत जाहीर करावी – खरात
- #Virar : आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’

