Share

‘विरारची दुर्घटना नॅशनल न्यूज नाही’, आरोग्यमंत्री टोपेंचे धक्कादायक वक्तव्य

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात तेरा रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यात पाच महिला तर आठ पुरुषांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.

पण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या सर्व पार्श्वभूमीवर एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही नॅशनल न्यूज नाही, असे वक्तव्य राजेश टोपेंनी केलेय. यामुळे आश्चर्य व्यक्त होतेय. घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘आपण रेमडेसीवीर, ऑक्सिजनबाबत बोलू शकतो. पण विरारची घटना ही नॅशनल न्यूज नाही. ही राज्यातील घटना आहे. राज्य सरकार त्यावर सर्वोतोपरी मदत करेल’, असे टोपे म्हणाले.

टोपे यांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतलाय. ‘आणखी किती बळी हवेत म्हणजे नॅशनल न्यूज होईल’, असा संतप्त सवाल त्यांनी केलाय. ‘राज्यातील आघाडी सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या संवेदना मेल्यात. त्यामुळेच हे लोक बेताल बडबड करत आहेत. आरोग्य व्यवस्था पार ढासळलीये. त्यात सुधारणा करण्याऐवजी यांना टीव्हीवर प्रसिद्धी पाहिजे अशी टीका दरेकर यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!