Share

लॉकडाऊनबाबत अमृता फडणवीसांकडून ठाकरे सरकारचे समर्थन

Published On: 

मुंबई : कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतरही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसतेय. त्यामुळे राज्य सरकारने १ मे पर्यंत लॉकडाऊन लावला आहे. सर्वसामान्यांना लोकल प्रवासबंदीही करण्यात आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र यावरून राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्णयाचं समर्थन केलंय.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘महाराष्ट्रातील रुग्ण आणि मृत्यूदर पाहता जर विचार करुन काही निर्णय घेतला असेल तर आपण त्याचा आदर केला पाहिजे. काही दिवस आपण धीर धरायला हवा. ब्रेक दि चेनसाठी हे गरजेचं आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन अमृता फडणवीस यांनी यावेळी केले.

यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून पुरेशी तयारी झाली नसल्याचंही सांगितलं. “पहिल्या लाटेनंतर येणाऱ्या दुसऱ्या लाटेसाठी पुरेशी तयारी झालेली नाही. आता खूप पाऊलं उचलण्यात आली आहेत. त्यामुळे टंचाई कमी होईल अशी आशा आहे. पण आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्यात आलेलं नसून त्यासाठी काम करणं गरजेचं आहे, अशी टीकाही अमृता यांनी ठाकरे सरकारवर केलीय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!