मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात तेरा रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यात पाच महिला तर आठ पुरुषांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 23, 2021
विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील एसीचा स्फोट झाला. यातील पाच जणांना दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या ठिकाणी ९० जणांवर उपचार सुरू होते.
उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 23, 2021
मृतांची नावे पुढीलप्रमाणे – उमा सुरेश कंगुटकर, (स्त्री/वय वर्ष ६३), निलेश भोईर (पु/वय वर्ष ३५), पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव (पु/वय वर्ष ६८), रजनी कडू, (स्त्री/वय वर्ष ६०), नरेंद्र शंकर शिंदे (पु/वय वर्ष ५८), जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (पु/वय वर्ष ६३) कुमार किशोर दोशी (पु/वय वर्ष ४५), रमेश उपयान (पु/वय वर्ष ५५), प्रवीण शिवलाल गौडा (पु/वय वर्ष ६५), अमेय राजेश राऊत (पु/वय वर्ष २३), शमा अरुण म्हात्रे (स्त्री/वय वर्ष ४८), सुवर्णा पितळे (स्त्री/वय वर्ष ६४), सुप्रिया देशमुख (स्त्री/वय वर्ष ४३).
महत्वाच्या बातम्या
- ‘विरारसारख्या घटना वारंवार घडताहेत, कठोर पावलं उचलणे गरजेचे’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्विट
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
- बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हाती देणार नाही; ममता बॅनर्जींचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

