🕒 1 min read
मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्यांच्यावर उपचारासाठी बेडही अपूरे पडत आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. नाशिक येथे ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा मृत्यूंची घटना ताजी असतानाच विरारमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
दरम्यान राजकीय स्तरावरून या घटनेप्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणावर संवेदना व्यक्त केल्यात. ‘विरारच्या विजय वल्लभ कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ निष्पाप रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! यांसारख्या धक्कादायक घटना वारंवार घडतायेत. कठोर पावलं उचलणे गरजेचं आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.’ अशी मागणी गायकवाड यांनी केलीय.
विरारच्या विजय वल्लभ कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ निष्पाप रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! यांसारख्या धक्कादायक घटना वारंवार घडतायेत. कठोर पावलं उचलणे गरजेचं आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 23, 2021
तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणामुळे राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरल आहे. ‘महाराष्ट्रात कोरोना आगीमुळे, ऑक्सिजनमुळे कोरोना मृत्यूचे तांडव सुरु आहे. विरारमधील आगीमध्ये १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला हि खूप दुर्दैवी बाब आहे. आता ठाकरे सरकारने अशा परिस्थिती केंद्र सरकारची, आर्मीची मदत घेतली पाहिजे. तसेच प्रत्येक कोविड रुग्णालयाच फायर आणि ऑक्सिजन ऑडीट झाल पाहिजे. आणि या सर्व घटनांची जबादारी स्वीकारून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा दिला पाहिजे.’ अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
- बंगाल दिल्लीतील दोन गुंडांच्या हाती देणार नाही; ममता बॅनर्जींचा घणाघात
- विरारची घटना दुर्दैवी, आरोग्यमंत्री टोपेंनी राजीनामा द्यावा : किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
