मुंबई : महाराष्ट्र राज्यात मराठी मालिका घरा-घरापर्यंत पोहचत आहेत. परंतू सध्या स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेने तर सर्वांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या वर्षीचा म्हणजेच 2022चा पुरस्कार सोहळा नुकताच 3 एप्रिल रोजी पार पडला आहे. सोहळ्यादरम्यान अनेक अभिनेत्री-अभिनेत्यांचे व्हिडीओ, फोटो खूप व्हायरल झालेले आपण पाहिले.
अशातच एका कलाकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील कलाकार दुसरा-तिसरा कोणी नसून, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेती अनिरूद्धची भूमिका साकारणारा म्हणजेच खऱ्या आयुष्यातील मिलिंद गवळी आहे.
मिलिंदने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भन्नाट डान्स केला आहे. ‘आश्विनी ये ना…’ या मराठी गाण्यावर मिलिंद थिरकला असल्याचं पाहायला मिळतं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते की, त्याचा हा व्हिडीओ स्टार प्रवाहच्या ॲवॉर्ड दरम्यानच्या डान्सच्या प्रॅक्टिसचा आहे. हा व्हिडीओ स्टार प्रवाहच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.
तसेच, मलिंद ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका साकारत आहे. परंतू तरीदेखील त्याला त्याच्या चाहत्यांकडून खूप कौतुक ऐकायला मिळत आहे. आपण पाहिलं तर सहसा नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला फारसं डोक्यावर चढवलं जात नाही. परंतू मिलिंद यामध्ये अपवाद आहे, असंच म्हणावं लागेल.
महत्वाच्या बातम्या:


