नवी-दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. काल(१९ नोव्हें.) सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली. या कायद्याविरोधात मागील वर्षभरापासून दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत होता. यासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय व्यक्तींनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. अमेरिकन गायिका रिहानाने(Rihanna) देखील ट्वीट करत शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला होता.
रिहानाने यावर्षी फेब्रुवारीमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. या ट्विटमध्ये तीने शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक बातमी शेअर केली होती. यासोबत रिहानाने लिहिले होते, ‘लोक याविषयी का बोलत नाहीत?’ रिहानाच्या या ट्विटमुळे बराच वाद झाला होता.
अमेरिकन गायिका रिहानाचे आज मनःपूर्वक आभार मानायला हवे. शेती कायदे मागे घेतले जाण्यात तिचा खारीचा वाटा आहे.
तिच्याच ट्वीटमुळे साऱ्या जगाचं लक्ष शेतकरी आंदोलनाकडे गेलं आणि सरकारची नाचक्की झाली होती.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2021
दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी यासंदर्भात ट्वीट केले असून ‘अमेरिकन गायिका रिहानाचे आज मनःपूर्वक आभार मानायला हवे. शेती कायदे मागे घेतले जाण्यात तिचा खारीचा वाटा आहे. तिच्याच ट्विटमुळे साऱ्या जगाचं लक्ष शेतकरी आंदोलनाकडे गेलं आणि सरकारची नाचक्की झाली होती’, असे आव्हाड म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला- सोनिया गांधी
- ‘एसटीच्या खासगीकरणाचा सध्या विचार नाही, पण याला ‘हा’ एकच पर्याय उपलब्ध’
- ‘नाना पाटोलेंचे मानसिक संतुलन बिघडले’
- पेन्शन पासून वंचित पात्र स्वातंत्र्य सैनिकांना न्याय द्या; सामाजिक संघटनांचे ठाकरे सरकारला साकडे!
- कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने; चंद्रकांत पाटलांची खंत


