टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. राज्यातील सर्वच स्तरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे होत आहे.
याच पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत भीक मागून मदत गोळा केली होती. यावर संभाजीराजे यांनी ‘स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव काय? इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही’ अस विधान केले होते याला आता तावडे यांनी उत्तर दिले आहे.
@TawdeVinod स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव काय? हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. pic.twitter.com/rIhGHZ52EE
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 19, 2019
तावडे यांनी बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार १० रुपये, ५० रुपये, १०० रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे.
तसेच या आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगलीतील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठविली, तर याला भीक का म्हणावे, हा प्रश्न ही मदत देणाऱ्या प्रत्येक माणसाला पडला आहे आणि म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे.
- अहिल्यादेवी होळकर महामंडळाकडून पूरग्रस्तांना १० लाखांची मदत
- अभिनेत्री दिपाली सय्यदचा दिलदारपणा; पूरग्रस्त १००० मुलींच्या लग्नाची स्वीकारली जबाबदारी
- आता बाण हातात आहे, घड्याळ बंद पडलंय; जयदत्त क्षीरसागरांची राष्ट्रवादीवर टीका
- सत्ता आल्यावर सत्ताधाऱ्यांना पळता भूई थोडी करू : धनंजय मुंडे


