नागपूर : महाविद्यालयात भगवत गीता देण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे तर दुसऱ्या बाजूला भगवदगीता वाईट आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांनी जाहीर करावं असं आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे. तावडे यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे गीतेचा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे
परिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, नॅक मुल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी प्राचार्यांना भगवदगीतेच्या १०० संचाचे वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे.फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटली जाणार आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे.
दरम्यान,विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना विनोद तावडे यांनी भगवदगीता वाईट आहे असं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवाद्यांनी जाहीर करावं असं आव्हानच दिलं आहे. तसंच श्रीकृष्ण खोटं बोलत होते असं मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट करावं असं विनोद तावडेंनी म्हटलं आहे.
नॅकचे A आणि A+ चे नामांकन असलेल्या मुंबईतील महाविद्यालयात भगवत गीतेचे वाटप करावेत असा आदेश उच्च शिक्षण विभागाने काढला आहे. उच्च शिक्षित असलेल्या तावडे यांना आणि त्यांच्या सरकार हिंदुत्ववादी धोरण राबवायचे आहे ते यावरून स्पष्ट होत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवतगीता वाचली आहे का? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे. बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न विनोद तावडे यांनी यापुढे थांबवावा असा सल्ला देखील पाटील यांनी तावडे यांना दिला आहे.
साऱ्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राचा बोजवारा उडालेला असताना सरकार अशा वादग्रस्त गोष्टी मुद्दाम करते आहे, असे महाराष्ट्रातील जनतेला वाटते. आम्ही भगवतगीतेच्या विरोधात नाही मात्र महाविद्यालयांत धार्मिक ग्रंथ वाटण्याची चुकीची प्रथा सरकारने पाडू नये.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 12, 2018
दोन महिन्यांत शिक्षकांच्या १८ हजार रिक्त जागा भरणार : विनोद तावडे
महानगरांसाठी स्वतंत्र क्रीडा आराखडा तयार करणार : विनोद तावडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

