Share

मराठा आरक्षणासाठी सरकारने आमच्यावर मोर्चे काढण्याची वेळ येऊ देऊ नये – विनोद पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकही ठाकरे सरकारविरोधात आक्रमक टीका करत आहेत. दिवसेंदिवस मराठा समाजाची नाराजी वाढत असल्याचे चित्र असून आगामी काळात यामुळे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढेल अशी शक्यता निर्माण होऊ लागली आहे.

दरम्यान,दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्याने राज्यसनभेत आहेत. त्यांनी त्यांच्या पाठिंब्याने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. यानंतर देखील विरोधकांनी चांगलीच आगपाखड केल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण मिळालेले थांबले. राज्य सरकारला येत्या 9 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तो पर्यंत जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा मराठा समितीच्या नेत्यांनी दिला.

दरम्यान, याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, आम्ही ज्यावेळेस आंदोलन करण्याचे जाहीर करू, त्यावेळी मागच्या मोर्च्यांपेक्षा शंभर पटीने मोर्चे काढण्याची ताकद आजही मराठा समाजामध्ये आहे मात्र परिस्थितीच भान ठेवून आम्ही अस करणार नाहीत. मराठा समाज आज जे काही आंदोलन करीत आहे ते मोजक्या कार्यकर्त्यांसह करीत आहोत.आमचे आंदोलन माननीय न्यायालयाच्या विरोधात नाहीत, फक्त राज्य सरकारला लक्षात आणून देण्यासाठी करीत आहे आणि आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी आपली आहे हे राज्य सरकारला निदर्शनास आणून देण्यासाठी आहे. तरी सरकारने आमच्यावर मोर्चे काढण्याची वेळ येऊ देऊ नये ही विनंती, त्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत असं पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या : –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!