🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वांचीच भावना असून, मराठा समाजाची बाजु लोकसभेत आपण स्वतः भक्कमपणे मांडणार असल्याची ग्वाही शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोंखडे यांनी दिली आहे.
शिवसेना खासदारांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला असुन त्यानिमित्ताने खासदार सदाशिव लोखंडे यांचा सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा तरुणांनी सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते.
खा.लोखंडे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी यासाठी खंडपीठाकडे विनंती अर्ज केला आहे. महाराष्ट्र शासन आरक्षण टिकावे यासाठी गंभीर असून शासन म्हणून सर्वतोपरी काळजी घेत प्रभावीपणे न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम करीत आहे, असे खा.लोखंडे म्हणाले. तसेच राज्य सरकारने आरक्षणाचा तोडगा निघेपर्यंत पोलिस भरतीला स्थगिती द्यावी, केंद्राने मराठा समाजाला दिलेले आरक्षण समाजाला मान्य नसल्याचे मराठा तरुणांनी खा.लोखंडेंना सांगितले.
त्यावर खासदार लोखंडे म्हणाले, समाजाच्या भावना समजत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ही मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळणार आहे. तसेच इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे सध्या कुणीही आरक्षणावरुन राजकारण करु नये, असा राजकीय टोला खा.लोखंडे यांनी लगावला आहे.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडधे, ॲड.संदीप चोरगे, संतोष ठोकळ, श्रीकांत शेळके, अमोल जैत, आकाश मोरगे, योगेश मरकड, अनिकेत धनगे, ऋषिकेश मोरगे, सिद्धेश निकम, अजय बोर्डे, लक्ष्मीकांत शिंदे, प्रफुल्ल पवार, स्वप्निल लांडे, तुषार पवार, भारत कदम, प्रसन्न बोर्डे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या : –
- नियम मोडल्याने स्टार खेळाडूवर कारवाई? चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापन म्हणतं ‘ते’ वृत्त खोटं
- भाजपचे झुंजार नेते नारायण राणेही अडकले कोरोनाच्या विळख्यात!
- बार-हॉटेल्स सुरु होणार मग मंदीरं बंद का? राणा जगजितसिंह पाटील यांचा थेट सवाल
- धक्कादायक; रात्रीच्या अंधारात अज्ञातांनी पेटवली कांदाची चाळ
- पायी हाथरस गाठण्याचा हट्ट करणाऱ्या राहुल गांधींना युपी पोलिसांनी केली धक्काबुक्की व अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
