Share

मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी अन्यथा ‘मातोश्री’ बाहेर आंदोलन करू; मराठा समाज आक्रमक

Published On: 

मुंबई – सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकही ठाकरे सरकारविरोधात आक्रमक टीका करत आहेत. दिवसेंदिवस मराठा समाजाची नाराजी वाढत असल्याचे चित्र असून आगामी काळात यामुळे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढेल अशी शक्यता निर्माण होऊ लागली आहे.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण मिळालेले थांबले. राज्य सरकारला येत्या 9 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तो पर्यंत जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा मराठा समितीच्या नेत्यांनी दिला.

कोल्हापुरात आज मराठा समाज समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन समितीचे आबा पाटील यांनी या बैठकीसंदर्भात माहिती दिली. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका बाहेर येत नसल्याने तरुणांमध्ये संभ्रमाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. समाजाशी संवाद साधावा. मंगळवारपर्यंत निर्णय घ्या. त्यानंतर मात्र, 6 ऑक्टोबर रोजी आम्ही मातोश्रीसमोरच आंदोलन करू, असा इशारा आबा पाटील यांनी दिला.tv9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

तर दुसऱ्या बाजूला १० तारखेला महाराष्ट्र कडकडीत बंद राहणार आहे यासाठी राज्यभरात दौरा सुरु आहे. EWS आरक्षण तात्काळ लागू करा, नोकरभरती बंद करा आणि समाजातील तरुणांवर दाखल झालेले बोगस गुन्हे रद्द करा. या तीन गोष्टी सरकारने मान्य केल्या तर कदाचित १० तारखेच्या बंदवर विचार करू अन्यथा १० तारखेला राज्यभरात बंद पाळला जाईल, हा कडकडीत बंद होण्यासाठी समाजात जाणार असल्याचं मुंबईत सुरेश पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान,दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्याने राज्यसनभेत आहेत. त्यांनी त्यांच्या पाठिंब्याने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. यानंतर देखील विरोधकांनी चांगलीच आगपाखड केल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या : –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!