Share

ठाकरे सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला; विनोद पाटलांचे गंभीर आरोप

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. यानंतर, स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने याचिका दाखल केल्या.

मराठा आरक्षण उठवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मराठा संघटनांसह भाजपने देखील राज्य सरकारवर टीका केल्याचं समोर आलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप देखील काही नेत्यांनी केला. आता, मराठा समाजाचे समन्वयक विनोद पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

‘राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला,’ असा गंभीर आरोप त्यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. आरक्षणाच्या स्थगितीमुळे अनेक प्रवेश प्रक्रियांसह पुढील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ‘मराठा समाजसोबत राज्य सरकारचं वर्तन दोषपूर्ण असून विशेष बाब म्हणून जागाही वाढवल्या नाहीत फी मध्ये सवलतही दिली नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.

‘राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार, असा एल्गार त्यांनी केला असून सुप्रीम कोर्टातही राज्य सरकारची चाल ढकल सुरू असल्याचा घणाघात विनोद पाटील यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असं चित्र निर्माण होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!