🕒 1 min read
लातूर : मागील काही दिवसात होत असलेल्या पावसामुळे मांजरा आणि तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले आहेत. या दोन्ही धरणात अजून पाण्याची आवक सूरू असल्याने धरणातरील अतिरिक्त पाणी नदीद्वारे तसेच कालव्यातूमन (आरओएस प्रमाणे) सोडण्यात येत आहे. त्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात येवून मांजरा आणि तेरणा नदीवरील सर्व नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहून आपत्तकालीन परिस्थितीत तालुका प्रशासनास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथवीराज बी.पी. यांनी केले आहे.
पुढील दोन-तीन दिवसात मोठया पावसाची शक्यता असल्याने नदीकाठच्या सर्व गावांनी सर्तक राहावे. संभाव्य पूरपरिस्थिती व वीज पडण्याची शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना शक्यतो घराबाहेर जाण्याचे टाळावे. कोणत्याही परिस्थितीत पुरच्या पाण्यात जावू नये. जिल्ह्यातील जलसाठे पूर्ण क्षमतेने भरलेला असल्याने कोणीही जलसाठे पाहण्यासाठी/पर्यटनासाठी जाऊ नये.
नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे. नदीपात्राजवळ घरे असलेल्या नागरिकंनी विशेष काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. आपल्या गरजेच्या वस्तू (औषधी,रोख रक्कम) स्वत:जवळ बाळगावी. नदीपात्राजवळ आपली मुकी जनावरे बांधू नयेत. जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पुलावरून, नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल/नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूल प्रवर्ण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. पाऊस सुरू असताना विजेच्या तारा/जुन्या ईमारती कोसळण्याची शक्यता असते. तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी.
महत्त्वाच्या बातम्या
- चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे-नारायण राणे येणार एकाच मंचावर
- ‘सोमय्यांच्या मागे आम्हीच हे फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी खुलेपणाने सांगावे’, सतेज पाटलांचे आव्हान
- सोमय्या चार वाजता टाकणार राजकीय ‘बॉम्ब’; नेमका कोणता घोटाळा बाहेर काढणार ? चर्चांना उधाण
- सरकारचा सावळा गोंधळ सुरूच; एकाच दिवशी विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार दोन परीक्षा
- आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झालीये; सोमय्या पुन्हा कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
