Share

सोमय्या चार वाजता टाकणार राजकीय ‘बॉम्ब’; नेमका कोणता घोटाळा बाहेर काढणार ? चर्चांना उधाण

Published On: 

कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यापार्श्वभूमीवर सोमय्या आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेत कोल्हापूरच्या दौऱ्याची सुरुवात केली आहे.

दरम्यान, सोमय्या हे मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी निघाले आहेत. मुरगूड हे मुश्रीफ यांच्या मतदारसंघात येत असल्याने तिथे काही संघर्ष होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. यासोबतच, मुश्रीफ यांचे आणखी दोन घोटाळे उघड करणार असा दावा देखील सोमय्या यांनी केला असल्याने राजकीय वर्तुळाचा त्यांच्याकडे लक्ष लागले आहे.

अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ‘भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा वध करण्यासाठी शक्ती दे, महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी अंबाबाईकडे मी प्रार्थना केली आहे. अंबाबाईची माझ्यावर कृपा आहे म्हणूनच मी कोल्हापूरला पोहोचलो आहे. यंत्रणेतला घोटाळा बाहेर काढण्यासाठी आज मी चार वाजता पुरावा देणार आहे,’ अशी माहिती सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आता ते नेमका कोणता घोटाळा काढणार यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!