Share

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे-नारायण राणे येणार एकाच मंचावर

Published On: 

मुंबई : कोकणातील चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आलेच पाहिजे असे काही नाही असे यापूर्वी नारायण राणे म्हणाले होते. मात्र आता उद्घाटनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने सर्वाच्याच भूवया उंचावल्या आहेत.

चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या पत्रिकाही छापण्यात आल्या आहेत. ९ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी १२.३० वाजता विमानसेवाही सुरु होणार आहे.

पत्रिकेत नारायण राणेंचे नाव तिसऱ्या क्रमांकावर

कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव क्रमांक एकवर असून त्यानंतर नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि नारायण राणे असा क्रम आहे. प्रोटोकॉलप्रमाणे हा क्रम देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार असा उल्लेख कार्यक्रम पत्रिकेवर आहे. या कार्यक्रमासाठी नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. या क्रार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी आलेच पाहिजे असे काही नाही, असे नारायण राणे म्हणाले होते, त्यामुळेच प्रोटोकॉल म्हणजे राणेंसाठी चपराक अशी चर्चा सुरु आहे.

चिपी विमानतळ उद्घाटन पत्रिका

नारायण राणे यांनी दिल्लीत ७ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहिर केली होती. उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावलच पाहिजे असे काही नाही, संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मुख्यमंत्री पाहिजेच असे काही नाही, असे राणे म्हणाले होते, या राणेंच्या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ उठला होता.

त्यानंतर शिवसेना भाजपात चांगलीच जुंपली होती. या वक्तव्यानंतर संजय राऊत म्हणाले होते, हे विमानतळ पीपीपी मॉडेलवरील आहे, ते महाराष्ट्राचेच आहे, केंद्राने केवळ लायसन्स दिले. राज्यात एखादा कार्यक्रम होत असेल तर त्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना द्यावेच लागते असेही राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!