पनवेल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. भाजपा तसंच इतर पक्षांनी हिंसाचारासाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ काल ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.
सध्या तृणमूल काँग्रेस च्या कार्यकर्त्यांकडून बंगालमध्ये अमानुष हिंसाचार सुरू आहे,बंगाल जळत आहे आणि विजयाचा उन्माद डोक्यात गेल्याने ममता बॅनर्जी हे मुकसंमत्तीने बघत आहेत या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टीचा जाहीर निषेध भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पनवेल येथे केला.
ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये भाजप कार्यत्यांवर तसेच कार्यालयावर भ्याड हल्याची मालिका चालवली आहे. दिवसाढवळ्या मुडदे पाडले जात आहेत आणि ही मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. याचा निषेध करत निवडणुकीचा विजय ममता बॅनर्जींच्या डोक्यात गेला असल्याची खंत विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली.
प. बंगालच्या विजयावर जणू काही स्वतःच्याच घरी पाळणा हलला अश्या आनंदात शुभेच्छांचा वर्षाव करणारे स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील संधीसाधू नेते यावर प्रतिक्रिया का देत नाहीत? निषेध का करत नाहीत? की यांचा या हिंसाचाराला मुकपाठिंबा आहे? असा सवालही विक्रांत पाटील यांनी विचारला. यावेळी त्यांच्यासह भाजपा नेते तथा कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील,भाजयुमो जिल्हा सरचिटणीस समीर कदम यांची ही प्रमुख उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय अहंकाराचा विषय करू नये’
- घरी पोहोचताच हार्दिक बनला कुक; वहिनी पंखुडीने केला व्हिडीओ शेअर
- आसाराम बापूची तब्येत खालावली, कोरोना झाल्यानंतर ICU मध्ये दाखल
- अदर पुनावालांना ‘Z प्लस’ सिक्यूरिटी द्यावी; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
- ‘सर्वोच्च न्यायालयातील अपयशाची जबाबदारी अशोक चव्हाण व राज्य सरकारला घ्यावीच लागेल’


