Share

‘मंत्र्यांनी आपली दहशत दाखविण्यासाठी जे कृत्य केलं त्याचा भुर्दंड राज्याच्या तिजोरीवर का?’

Published On: 

मुंबई – राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून आपणास मारहाण झाल्याचा आरोप अनंत करमुसे या तरूणानं केला होता. अनंतने वर्षभरापुर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. आव्हाडांना त्या पोस्टचा राग आल्यानं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगून त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यावर नेत मारहाण केल्याचा आरोप या तरूणानं केला आहे.

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. आता या प्रकरणातील वकिलाच्या फी मुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे BJYM प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी याबाबत निवेदन दिले आहे.

या निवेदनात ते म्हणतात, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुंडगिरी करत अनंत करमुसे नावाच्या एका युवकाला केलेली मारहाण संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करीत केवळ सोशल मीडिया वर पोस्ट टाकली म्हणून या युवकाला जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून घरी बोलावून पोलिस यंत्रणेच्या गैरवापर करीत बेदम मारहाण करण्यात आली होती.आता या विषयात मा. उच्च न्यायालयात राज्य सरकारने अनिल साखरे यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक केली असून प्रती सुनावणी त्यांना रू.२,५०,००० इतकी रक्कम दिली जाणार असल्याचा शासन निर्णय केला आहे.

मुळात ज्या गुंडगिरी प्रवृत्ती मुळे राज्याचं नाव बदनाम झाल,मंत्र्यांनी स्वतः चां इगो म्हणून आपली दहशत दाखविण्यासाठी जे कृत्य केलं त्याचा भुर्दंड राज्याच्या तिजोरीवर का? हा प्रश्न जनतेच्या मनात आहे.जनतेच्या पैशातूनच जनतेला मारहाण करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी खर्च केला जाणार हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यामुळे अश्या निंदाजनक कृत्यांसाठीचा आर्थिक भुर्दंड जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः सहन केला पाहिजे ही मागणी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून करीत आहोत.

अश्याच अर्णब गोस्वामी प्रकरणात मा.सर्वोच्च न्यायालयातही विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून श्री अभिषेक मनू सिंघवी यांची नियुक्ती करीत राज्य सरकारने प्रती सुनावणी रू १२,५०,००० देण्याचा शासन निर्णय केला आहे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रसिध्दी करिता P R एजंसीसाठी तब्बल रू ६ कोटी खर्चाचां शासन निर्णय नुकताच करण्यात आला आहे. जनेतचा पैसा नेत्यांच्या अश्या वायफळ गोष्टींसाठी होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही.

एकीकडे कोरोना संकट काळात राज्यातील नागरिक तडफडून मरत असताना त्यांच्यावर खर्च करण्यासाठी राज्य सरकार कडे पैसे कमी पडतात,त्यावेळी केंद्रांनी मदत करावी अशी ओरड यांचे नेते करत राहतात आणि इकडे मात्र जनतेच्या पैशाचां हवा तसा गैरवापर सुरू आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत आणि असे नेत्यांचे इगो आणि इमेज जपण्यासाठी चे वायफळ खर्च संदर्भातील निर्णय राज्य सरकारने त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी आम्ही करीत आहोत,अन्यथा आम्हाला या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!