मुंबईः महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेतील कुरुबुरी अनेकदा समोर आल्या आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरात शिवसेनेकडून होत असलेल्या लसीकरण केंद्राच्या उद्धाटनावरुन काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेच्या चमकोगिरीविरोधात उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
वांद्रे पूर्वमध्ये नवीन लसीकरण केंद्राचं उद्घाटन शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याहस्ते करण्यात आलं. या उद्घाटनाला स्थानिक मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लसीकरण केंद्राच्या उद्घाटनासंदर्भात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरून आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत.
Welcome to the Grand vaccination utsav by Shiv Sena in Bandra East. There are more posters than vaccines here. Are vaccines being bought by Shiv Sena personal party fund as I don’t see any mention of MVA anywhere? Stop glorifying openings of vaccination centres, this is our duty! pic.twitter.com/AFM3cyNBcs
— Zeeshan Siddique (@zeeshanBabaS) May 13, 2021
झिशान यांनी आपल्या ट्विटरवर लसीकरण केंद्राजवळील शिवसेनेच्या चार पोस्टर्सचे फोटोही शेअर केले आहेत. लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपले कर्तव्य आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.वांद्रे पूर्व भागातील शिवसेनेच्या भव्य लसीकरण उत्सवात आपले स्वागत आहे. येथे लसींपेक्षा पोस्टर्स जास्त आहेत. शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का? कारण मला कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख दिसत नाही. लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपले कर्तव्य आहे! असं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- सोनूने शेअर केला भारतातील सर्वात श्रीमंत मुलीचा फोटो ; म्हणाला…
- ‘कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे, मजबूत आहे’
- ‘ई-पास’ शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आडवलं पोलिसांनी ; पहा काय आहे प्रकरण
- फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार – देवेंद्र फडणवीस
- कोरोना वरील विजयाचा दिवस हाच साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असेल – धनंजय मुंडे


