मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेतलं. या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. तर, सर्वाधिक आमदार असून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. हे तीन चाकी सरकार फार काळ टिकणार नाही, त्यांचे आपापसांत वाद होऊन हे सरकार कोसळेल असं भाकीत भाजप नेत्यांनी वर्तवलं आहे.
मात्र, या सरकारने वादळ, अतिवृष्टी, कोरोना यासारख्या प्रतिकूल स्थितीत दीड वर्ष पूर्ण केलं आहे. याकाळात काँग्रेसची नाराजी दिसून आली. मात्र, आता थेट राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आमने सामने आल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जातंय.
जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर नाराजी जाहीर केली. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी अशाचप्रकारे मुख्य सचिवांना लक्ष्य केले होते. दरम्यान यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा असून शिवेसना खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे.
“जयंत पाटील यांनी काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा केला आहे. कॅबिनेट मध्ये काय घडलं याबाबत बाहेर सांगू शकत नाही. चर्चा झाली असेल काही. बाहेर कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे, मजबूत आहे.कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल. पण आमची भांडी काचेची नाही ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही’’.
महत्वाच्या बातम्या
- सोनूने शेअर केला भारतातील सर्वात श्रीमंत मुलीचा फोटो ; म्हणाला…
- केंद्र सरकारच्या या पुढाकाराने मराठा आरक्षणास मोठी मदत मिळेल – चंद्रकांत पाटील
- ‘ई-पास’ शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आडवलं पोलिसांनी ; पहा काय आहे प्रकरण
- फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार – देवेंद्र फडणवीस
- कोरोना वरील विजयाचा दिवस हाच साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असेल – धनंजय मुंडे


