Share

सोनूने शेअर केला भारतातील सर्वात श्रीमंत मुलीचा फोटो ; म्हणाला…

Published On: 

मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

अशा परिस्थितीत सोनू सूद पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे. कोरोनाच्या सध्याच्या महाभयंकर लाटेत सोनू लोकांचे जीव वाचवताना दिसतोय. देशात ऑक्सिजन आणि बेड्सचा प्रचंड तुटवडा आहे. अशास्थितीत सोनू व त्याची टीम गरजू रूगणांना आॅक्सिजन पुरवण्याचे व बेड्स उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे.

सोनू सूद दररोज विविध पद्धतीने लोकांची मदत करत आहे. सोनूच्या या उपक्रमात अनेक मदतीचे हात सुद्धा पुढे येताना दिसत आहेत. मात्र नुकताच सोनू सूदच्या फौंडेशनमध्ये अशा एका मुलगीने मदतीचा हात दिला आहे. जी पैशाने नव्हे तर मनाने श्रीमंत आहे. या मुलीचं मोठं मन पाहून सोनूसुद्धा तिचा चाहता बनला आहे.

आंध्र प्रदेशच्या एका दिव्यांग मुलीने ही मदत केली आहे याबद्दल स्वतः सोनू सूदने ट्वीट करत माहिती दिली आहे. सोनूने ट्वीट करत म्हटलं आहे, ‘बोड्डू नागा लक्ष्मी ही एक दिव्यांग मुलगी आणि युटयूबर आहे. ती आंध्रप्रदेशमधील ‘वरीकुंटापाडू’ या छोट्याशा खेड्यात राहते. तिने सूद फौंडेशनमध्ये 15,000 रुपयांचा निधी मदत म्हणून दिला आहे. हा पैसा तिच्या 5 महिन्यांच्या पेन्शनचा आहे. ही माझ्यासाठी सर्वात श्रीमंत भारतीय आहे. तुम्हाला कोणाचही दुख पाहण्यासाठी फक्त डोळ्यांचीच गरज असते असं नाही. ही एक रियल हिरो आहे’. असे ट्विट करून सोनूने तिचे कौतुक केले आहे. आणि सोनू तिचा चाहता देखील बनला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!