Share

मंत्रिपद गेलं तरी बेहत्तर पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही – विजय वडेट्टीवार

Published On: 

🕒 1 min read

जालना : ओबीसी समाजाचे न्याय्यहक्क कुठल्याही परिस्थितीत अबाधित ठेवले जातील. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला तर वेळप्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे ओबीसी, मदत, पुनर्वसन आणि विमुक्त जाती भटक्या जमातीचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये. ही आमची भूमिका आहे. ओबीसी समाजाला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून न्याय्यहक्क मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघात भाजपची विजयाची परंपरा ओबीसी समाज एकजूट झाल्याने आणि तसेच महाविकास आघाडी सरकारच्या कामामुळे मोडीत निघाली आहे.

या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विजयामुळे भाजपच्या विचारांविरुद्ध देशामध्ये मोठा संदेश गेला आहे. यावेळी आमदार राजेश राठोड, बबनराव तायवडे, बाळासाहेब सानप, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद, प्रदेश सचिव प्रा.सत्संग मुंढे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राम सावंत आदींची उपस्थित होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!