🕒 1 min read
नवी दिल्ली – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी आपली व्यथा मांडत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपसोबत मैत्री टिकवली असती, तर आता मी मुख्यमंत्री असतो, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. काँग्रससोबत आघाडी करून 12 वर्षांत आपण जे कमावले होते, ते सर्व गमावले आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे.
I would have still been the chief minister if I had continued to maintain good relations with BJP. The goodwill I had earned in 2006-2007 & over a period of 12 years, I lost everything due to the alliance with Congress party: HD Kumaraswamy, former Karnataka CM pic.twitter.com/AosBsxKgWh
— ANI (@ANI) December 5, 2020
काँग्रेसने षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे. भाजपाने एवढी मोठी फसवणूक कधी केली नाही जेवढी काँग्रेसने केली असंही कुमारस्वामी यांनी यावेळी म्हटलं आहे.
काँग्रेससोबत युती करून चूक केली. त्यांच्यासोबत हातमिळवणी करायला नको होती असं देखील कुमारस्वामी यावेळी म्हणाले.काँग्रेसशी 2018 मध्ये आघाडी केल्यावर सिद्धरामय्या आणि त्यांच्या गटाने आपली प्रतिष्ठा धुळीत मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. एच.डी. देवेगौडा यांच्या सल्ल्यानुसार आपण काँग्रेसशी आघाडी केल्याने आपण काँग्रेसच्या जाळ्यात अडकल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- संजीवन समाधी सोहळ्याची गर्दी टाळण्यासाठी आजपासून आळंदीत संचारबंदी
- इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांचे स्मारकाचे काम कधी पूर्ण होणार? धनंजय मुंडे म्हणाले…
- जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचं निधन
- भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याचा 32 वा वाढदिवस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

