Share

‘कुमारस्वामींचे वर्तमान हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भविष्य’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी आपली व्यथा मांडत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपसोबत मैत्री टिकवली असती, तर आता मी मुख्यमंत्री असतो, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. काँग्रससोबत आघाडी करून 12 वर्षांत आपण जे कमावले होते, ते सर्व गमावले आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे.

काँग्रेसने षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे. भाजपाने एवढी मोठी फसवणूक कधी केली नाही जेवढी काँग्रेसने केली असंही कुमारस्वामी यांनी यावेळी म्हटलं आहे.

काँग्रेससोबत युती करून चूक केली. त्यांच्यासोबत हातमिळवणी करायला नको होती असं देखील कुमारस्वामी यावेळी म्हणाले.काँग्रेसशी 2018 मध्ये आघाडी केल्यावर सिद्धरामय्या आणि त्यांच्या गटाने आपली प्रतिष्ठा धुळीत मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. एच.डी. देवेगौडा यांच्या सल्ल्यानुसार आपण काँग्रेसशी आघाडी केल्याने आपण काँग्रेसच्या जाळ्यात अडकल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजपनेते आचार्य तुषार भोसले यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कुमारस्वामींचे वर्तमान हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भविष्य ! वाक्यात किरकोळ बदल असेल,शप यांच्या जाळ्यात अडकून मी महाराष्ट्राचा विश्वास गमावला !असं म्हणत भोसले यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!