नागपूर: नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा सिनेमा स्लम सॉकरचे निर्माते विजय बारसे यांच्यावर आधारीत आहे. झोपडपट्टीतल्या मुलांना स्वखर्चाने फुटबॉल शिकवण्याचे काम बारसे यांनी केलंय. सिनेमामध्ये बारसेंची भुमिका महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. प्रदर्शनापुर्वीच या सिनेमाचे कौतुक होताना दिसत आहे. या बद्दल विजय बारसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेले अनेक वर्ष मी “डेव्हलपमेंट थ्रू फुटबॉल” करत आहे आणि यामध्ये मला चांगले यश मिळाले आहे. परंतु आगामी काळात “डेव्हलपमेंट ऑफ फुटबॉल”साठी काम करणार असून, केवळ नागपूरसाठीच नाही तर आता देशासाठी खेळाडू तयार करण्याचे स्वप्न असल्याचे बारसे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

