मुंबई: भारतीय संघ श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. भारतासाठी हा सामना अनेक कारणांनी विशेष ठरणारा आहे. रोहित शर्मा कर्णधार म्हणून प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे . तर विराट कोहलीसाठी हा त्याच्या कारकिर्दीतील १००वा कसोटी सामना ठरला आहे. या सामन्यात विराट कोहली एक मोठी खेळी करेल कदाचित तो संधी साधत शतक करेल अशी आशा चाहत्यांना होती मात्र विराट पहिल्या डावात ४५ धावा करत पॅव्हेलियन मध्ये परतला. अवघ्या ५ धावांनी त्याचे अर्धशतकही हुकले.
विराट कोहली (virat kohli) चांगल्या प्रकारे धावा करत असतानाच बाद झाल्याने भारतीय संघातील खेळाडूही हैराण झाले. कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) डोक्यावर हात ठेवत उभा राहिला. विराट आणि भारतीय संघाचे चाहते त्याच्या ७१व्या शतकाचे मागील २ वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत. या सामन्यात तरी तो शतक झळकवेल अशी आशा असताना तो अर्धशतकही पूर्ण करू न शकल्याने चाहते निराश झाले आहेत. चाहत्यांनी यावेळी ट्विटरवरून आपली निराशा जाहीर केली आहे.
https://twitter.com/Diptiranjan_7/status/1499668854485635072?s=20&t=vgWg40dudAuii5vtNvbATA
2016-19's Virat Kohli to 21-22 Kohli???? pic.twitter.com/WFT68GSnbA
— Jack the Sparrow (@Virat18fann) March 4, 2022
*Fans waiting for Virat Kohli 71st century in every match*
Meanwhile Virat Kohli:- pic.twitter.com/B30miIw1Rd
— Pintu (@Pintuu0) March 4, 2022
https://twitter.com/Bloody_humorous/status/1499667870078599169?s=20&t=vgWg40dudAuii5vtNvbATA
Even Rohit couldn't believe it, Virat was playing so well. pic.twitter.com/Ym4MBpihIg
— Johns. (@CricCrazyJohns) March 4, 2022
विराट १००व्या कसोटी सामन्याची संधी साधत शतक झळकवेल अशी आशा अजूनही चाहत्यांना आहे. पहिल्या डावात विराटने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे शतक झळकावण्यासाठी दुसऱ्या डावात पुन्हा एक संधी आहे. त्याच्या बॅटला गवसलेला सूर आणि चाहत्यांच्या इच्छा शक्तीने विराट खरच १००व्या सामन्यात शतक झळकवेल का याची वाट भारतीय क्रिकेटरसिक बघत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- १०० सामन्यांचा तर केलाच, परंतु अजूनही एक विक्रम ‘किंग कोहलीने’ आपल्या नावावर केला आहे
- IND vs SL : दुर्दैव..! ऐतिहासिक कसोटीत विराट अपयशी; शतक तर हुकलच सोबतच…
- एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शक्य नाही; अनिल परबांनी विधानसभेत मांडला अहवाल
- ‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल म्हणाला, “माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा…”
- ओबीसी आरक्षणाला राज्य सरकारकडून ‘धक्का नाही धोका’; पंकजा मुंडे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

