Share

मोदी – फडणवीसांनी मागवलेला पाकिस्तानी कांदा आम्हाला नको, आमच्या शेतक-यांना जगू द्या : विद्या चव्हाण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तानच्या विरोधात मोदी – फडणवीस सरकार सतत गरळ ओकत असते. पाकिस्तानने पुलवामामध्ये भारतीय सैनिकांचे बळी घेतले. पण मोदी – फडणवीस सरकारला पाकिस्तानबद्दलच प्रेम आहे. पाकिस्तानी प्रेमापोटीच मोदी – फडणवीस सरकारने त्यांचा कांदा भारतात मागविल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतक-यांना चार पैसे मिळू लागल्याचे फडणवीसांना बघवले नाही. शेतक-यांना पैसे मिळतात म्हटल्यावर भाजप सरकारने पाकिस्तानचा कांदा मागवायचा निर्णय घेतला. कांदा परवडणारा नसेल तर एकवेळ मराठी जनता महागडा कांदा विकत घेणार नाही. पण महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पोटावर मारून पाकिस्तानचा कांदा आम्ही कदापी घेणार नाही. महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात आंदोलन करेल असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ‘या सरकारला पाकिस्तानचा कांदा, साखर गोड लागते. त्यामुळे सरकारचे पाकिस्तानवर विशेष प्रेम दिसून येते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे हात का बळकट करत आहात’, असा खोचक सवाल करत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी कांदा आयातीस विरोध दर्शविला.

मात्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!