मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व अन्य 15 बंडखोर आमदारांनी अपात्रतेच्या नोटिसीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सचिव, केंद्र सरकार आणि इतरांना नोटीस बजावली आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेना नेते अजय चौधरी, सुनील प्रभू यांनाही नोटीस बजावली असून उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत एकनाथ शिंदे म्हणत आहेत कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पाच विभागांचा राज्यमंत्री म्हणून मी सरकारमध्ये मी काम करत आहे. पाच खाती राज्यमंत्री म्हणून आमच्याकडे आहेत. खाती आमच्याकडे दिली पण राज्यमंत्र्याला किती अधिकार होते हे देखील निमित्ताने माहिती होणं गरजेचं आहे. असं ते म्हणालेत.
https://twitter.com/mieknathshinde/status/1541383599400046592
तसेच पुढे बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केलेत. राज्यमंत्री असूनदेखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नाही. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देतात. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांकडे यासंदर्भात वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही अशी व्यथा शंभुराजे देसाई यांनी मांडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


