🕒 1 min read
मुंबई : काल रात्री मुंबईच्या (Mumbai) कुर्ला भागातील एक चार मजली इमारत कोसळली. अग्निशामक दल आणि एनडीआरएफ पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांच्याकडून बचावाचे कार्य सुरुच आहे. इमारत कोसळून अनेकजण खाली दबले गेले होते. या घटनेनेनंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.
तसेच यावेळी आदित्य ठाकरेंनी मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. पहाटे तीन वाजेच्या सुमारास आदित्य ठाकरे पोहोचले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी ही जुनी इमारत होती आणि महापालिकेने नोटीस दिलेली होती. इमारत धोकादायक झाल्याने महापालिकेने नोटीस देऊनही ती रिकामी करण्यात आली नाही. आता या घटनेत सर्वप्रथम बचावकार्यावर भर देण्यात येत आहे आणि जखमींवर उपचार करण्यात येत आहे, अशी माहिती दिली.
दरम्यान या इमारतीमध्ये 20-25 जण राहत असल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी 15-18 जणांना वाचवण्यात आलंय. तर अजूनही 5 ते 6 लोक दबले गेले असण्याची भीती व्यक्त केली जातेय. सोमवारी मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारत ही घटना घडली. ही धोकादायक इमारत होती. तरिही या इमारतीत कुटुंब वास्तव्य करत होती. या इमारतीत राहत असलेली लोकं सोमवारी रात्री झोपेत असताना ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. त्यामुळे कुणालाच जीव वाचवण्यासाठीची संधीही मिळू शकली नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
