Share

VIDEO: हसरंगाच्या गुगलीचा शेल्डन जॅक्सन ठरला बळी, चेंडू पडल्यानंतर कसा वळला ते तुम्ही पाहाच

Published On: 

मुंबई: IPL 2022 च्या सहाव्या सामन्यात वानिंदू हसरंगाने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच चेंडूत केकेआरचे जबरदस्त नुकसान केले. सामना सुरू होण्यापूर्वी आरसीबीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला जो संघासाठी योग्य ठरला. वानिंदू हसरंगाने आपल्या गोलंदाजीचे जबरदस्त कौशल्य दाखवले आणि शेल्डन जॅक्सनही त्याच्या गुगलीपासून वाचू शकला नाही.

नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) सुरुवात खूपच खराब झाली. संघाने पॉवर प्लेचा चांगला वापर करूनही विकेट पडण्याची प्रक्रिया सुरूच होती. सलामीवीर व्यंकटेश अय्यरची आणि रहाणेही आजच्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे राहू शकला नाही. सर्वांच्या नजरा कर्णधार श्रेयस अय्यरवर होत्या. पण, तो येताच त्याने काही उत्तम फटके खेळले आणि त्याची विकेट्स घेऊन निघून गेला. नितीश राणा ते बिलिंग्स आणि नरेनही आले आणि पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर शेल्डन जॅक्सन (Sheldon jackson) फलंदाजीला आला. पण, तो पहिलाच चेंडू खेळू शकला नाही आणि हसरंगाच्या (vanaindu hasranga) गुगलीचा तो बळी ठरला.

https://twitter.com/SportsHustle3/status/1509183795681177608?s=20&t=tymkXHWu84aIIDQo92fy1g

शेल्डन जॅक्सन ९व्या ओव्हरमध्ये जेव्हा संघाला सर्वात जास्त गरज होती तेव्हा हसरंगाच्या गुगलीचं शिकार बनला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सतत विकेट घेत असलेल्या वानिंदू हसरंगाची गुगली शेल्डनलाही वाचता आली नाही आणि पहिल्याच चेंडूवर त्याने महत्त्वाची विकेट गमावली. हसरंगाच्या स्पेलचा शेवटचा चेंडू खेळायला आलेल्या शेल्डन जॅक्सनने फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू थेट ऑफ-स्टंपच्या आत गेला आणि मधल्या स्टंपकडे गेला आणि केकेआरचा गोल्डन डकवर थेट पॅव्हेलियनमध्ये परतला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!