🕒 1 min read
मुंबई: विराट कोहलीच्या फिटनेसची चर्चा संपूर्ण क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. हेच कारण आहे की श्रीलंकेचा खेळाडू भानुका राजपक्षे त्याला ‘क्रिकेटचा ख्रिस्तियानो रोनाल्डो’ मानतो. खेळाडूसाठी टॅलेंट अधिक महत्त्वाचे असल्याचे तो म्हणतो. पण, आवश्यक फिटनेस मानके गाठल्याशिवाय आजच्या क्रिकेटमध्ये टिकून राहणे शक्य नाही हेही त्याला कळून चुकले आहे. फिटनेसमुळे राष्ट्रीय संघाबाहेर असलेला भानुका राजपक्षे याला या मुद्द्यावर टीम इंडियाच्या फिट क्रिकेटर्समध्ये गणल्या जाणाऱ्या विराट कोहलीचे मत घ्यायचे आहे.
भानुका राजपक्षे (bhanuka rajpakshe) सध्या आयपीएल २०२२ मध्ये खेळत आहे. तो पंजाब किंग्ज (PBKS) संघाचा सदस्य आहे. तो एक धमाकेदार खेळाडू आहे मात्र तो सध्या फिटनेस बाबतीत चिंतेत आहे. यासाठी त्याला विराटला बोलायचे आहे. त्याने सांगितले, विराट कोहली (Virat kohli) अशी व्यक्ती आहे ज्याच्याशी मी बोलू शकतो आणि फिटनेसबद्दल काही सूचना घेऊ शकतो. फिटनेसच्या बाबतीत तो खूप वेगळ्या पातळीवर आहे. माझ्यासाठी तो नक्कीच क्रिकेटचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (cristiano ronaldo) आहे. तंदुरुस्ती आणि कौशल्याच्या बाबतीत त्याला तोड नाही. तो खूप चांगला खेळतो आणि त्याच्याशी बोलून तुम्ही खूप काही शिकू शकता.’
भानुका राजपक्षेने जानेवारी २०२२ मध्ये वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण, अधिकाऱ्यांनी खूप गयावया केल्यानंतर त्याने आपला निर्णय बदलला आणि पुन्हा लंकन संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. पण, फिटनेसमुळे त्याला गेल्या महिन्यात भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत संधी मिळू शकली नव्हती. आता त्याने विराटबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर विराट आगामी सामन्यात नक्कीच त्याला भेटून टिप्स देताना दिसू शकतो.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 RCB vs KKR : बंगळुरुचा कप्तान फाफ डु प्लेसिसने जिंकला टॉस; प्रथम करणार…
- Shane Warne State Funeral MCG : गूड बाय शेन..! फिरकीच्या जादुगाराला ऑस्ट्रेलियाकडून अंतिम निरोप
- ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेनं दुबईत फडकवला मराठी झेंडा
- “कोणता भूकंप आला आहे कि तुम्ही रोज इंधन दरवाढ करताय?- नाना पटोले
- ‘आश्रम’ फेम त्रिधा चौधरी आणि ऋत्विक धनजानी ‘अरेंज्ड’ शॉर्ट फिल्ममध्ये एकत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
