🕒 1 min read
मुंबई : फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दमदार गोलंदाजीचा नजराणा पेश करत कोलकाता नाइट रायडर्सला १२८ धावांवर रोखले. डी. वाय. पाटील येथे सुरू असलेल्या सामन्यात डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फिरकीपटू वानिंदू हसरंगा, आकाश दीप आणि हर्षल पटेल यांनी कोलकाताच्या फलंदाजांना जखडून ठेवले. हसरंगाने ४ षटकात २० धावा देत ४ बळी टिपले. कोलकाताचा संघ १८.५ षटकात १२८ धावांवर ऑलआऊट झाला.
कोलकाताचा डाव
मागच्या सामन्यात दमदार फलंदाजी केलेल्या अजिंक्य रहाणेला (९) यावेळी काही खास करता आले नाही. त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. दुसरा सलामीवीर फलंदाज व्यंकटेश अय्यर (१०) आणि नितीश राणा (१०) यांना बंगळुरूचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने तंबुचा मार्ग दाखवला. त्यानंतर फिरकीपटू वानिंदू हसरंगाने फास आवळला. त्याने कोलकाताचा कप्तान श्रेयस अय्यर (१३), सुनील नरिन (१२), शेल्डन जॅक्सन (०), टिम साऊदी (१) यांना बाद करत कोलकाताच्या मोठ्या धावसंख्येकडे जाण्याच्या स्वप्नांना सुरुंग लावला. स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने १ चौकार आणि ३ षटकारांसह २५ धावा केल्या. त्याच्यामुळे संघाला शंभरी गाठता आली. कोलकाताचा शेपटाकडील फलंदाज उमेश यादवने १८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बंगळुरूकडून हसरंगाशिवाय आकाश दीपने ३ तर हर्षल पटेलने २ बळी घेतले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कप्तान), सॅम बिलिंग्ज, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नरिन, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या –
- विराटच्या फिटनेसवर श्रीलंकेचा क्रिकेटर घायाळ; म्हणाला, “तो माझ्यासाठी रोनाल्डोच”!
- IPL 2022 RCB vs KKR : बंगळुरुचा कप्तान फाफ डु प्लेसिसने जिंकला टॉस; प्रथम करणार…
- Shane Warne State Funeral MCG : गूड बाय शेन..! फिरकीच्या जादुगाराला ऑस्ट्रेलियाकडून अंतिम निरोप
- ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेनं दुबईत फडकवला मराठी झेंडा
- “कोणता भूकंप आला आहे कि तुम्ही रोज इंधन दरवाढ करताय?- नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
