🕒 1 min read
मुंबई : आज आयपीएल २०२२मध्ये नवी मुंबईच्या डी. वाय पाटील स्टेडियमवर रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत रंगत आहे. या सामन्यात बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची (आरसीबी) यंदाच्या हंगामाची सुरुवात पराभवाने झाली. पहिल्या सामन्यात बंगळुरूचा पंजाब किंग्जने मोठा पराभव केला होता. बंगळुरू संघाने २०५ धावा केल्या होत्या, तरीही पंजाबने हे लक्ष्य गाठले. तर दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सने यंदा शानदार सुरुवात केली. कोलकाताने पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कप्तान), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कप्तान), सॅम बिलिंग्ज, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नरिन, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या –
- आदिपुरुष’ मधील प्रभासचा फर्स्ट लूक? रामाच्या भूमिकेत दिसणार ‘बाहुबली’
- “…या नौटंकीला मी काडीची किंमत देत नाही”- प्रवीण दरेकर
- तैमूर आणि इनाया खेमूचे गोंडस क्षण कॅमेऱ्यात कैद, फोटो होतोय व्हायरल
- काँग्रेस शरद पवारांना कधीच यूपीए अध्यक्ष पद देणार नाही – विनायक मेटे
- राजपाल यादवने वर्कआऊटमध्येही लावला कॉमेडीचा तडका! मजेशीर व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
