Share

Shane Warne State Funeral MCG : गूड बाय शेन..! फिरकीच्या जादुगाराला ऑस्ट्रेलियाकडून अंतिम निरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: फिरकीचा जादूगार मानल्या जाणाऱ्या शेन वॉर्नचे गुरुवारी मेलबर्नमध्ये अखेरचा निरोप दिला, ज्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) मध्ये मोठ्या संख्येने त्याचे चाहते आणि मित्रपरिवार उपस्थित होते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोह सामुई, थायलंड येथे सुट्टीवर असताना त्याचे संशयास्पद हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले होते. त्याच्या अचानक जाण्याने क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे.

शेन वॉर्नसाठी (shane warne) एक खाजगी अंत्यसंस्कार आधीच आयोजित केले गेले होते , ज्यात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनसह अनेक खेळाडू उपस्थित होते.
शेनच्या अंतिम निरोपासाठी ५०,००० हून अधिक लोक स्टेडियमवर स्मारकासाठी जमले होते. जेथे वॉर्नने त्याच्या कारकिर्दीतील मैलाचे दगड पार केले आहेत. २००६ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ७०० वी विकेट इथेच घेतली होती.

वॉर्नच्या तीन मुलांनी MCG येथे अधिकृतपणे नवीन शेन वॉर्न स्टँडचे अनावरण केले. वॉर्नचा पुतळा आधीच स्टेडियमच्या बाहेर उभा आहे आणि गेल्या तीन आठवड्यांपासून ते लोकांसाठी श्रद्धांजली वाहण्याचे अनधिकृत ठिकाण बनले आहे. लाईव्ह प्रसारित झालेल्या वॉर्नला अंतिम निरोप कार्यक्रमात सचिन तेंडुलकर सह अनेक खेळाडूंनी व्हिडीओद्वारे श्रद्धांजली वाहिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!