मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री श्रेया बुगडेने नुकतीच एक अभिमानास्पद गोष्ट केली आहे.तिचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. कारण श्रेयाने दुबईत मराठीचा झेंडा फडकवला आहे. आता तो कसा काय ते पहा.
श्रेया बुगडे नुकतीच दुबईला ‘दुबई महाराष्ट्र मंडळा’च्या एका कॉन्सर्टसाठी गेली होती. याचे काही फोटो श्रेयाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रेयासोबत गायिका प्रियांका बर्वे, गायक नचिकेत लेले, म्युझिशीयन धवल चांदवडकर दिसून येत आहेत.
हे फोटो शेअर करत श्रेया बुगडेने कॅप्शनमध्ये, ” थँक्यू दुबई असंच नेहमी मॅजिकल राहिल्याबद्दल… काय मस्त कॉन्सर्ट होता… सर्वांसोबत स्टेज शेअर करायला मजा आली. थँक्यू ‘दुबई महाराष्ट्र मंडळ इतके प्रेम दिल्याबद्दल…. हे खूप अविस्मरणीय होते. असे कॅप्शन तिने फोटो शेअर करून दिले आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
‘आश्रम’ फेम त्रिधा चौधरी आणि ऋत्विक धनजानी ‘अरेंज्ड’ शॉर्ट फिल्ममध्ये एकत्र
बोरिवलीत धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला पकडण्यात यश; व्हिडिओ व्हायरल
ICC Test Ranking जाहीर; जडेजा-अश्विन अव्व्ल स्थानी तर कोहली – रोहितला झटका
आदिपुरुष’ मधील प्रभासचा फर्स्ट लूक? रामाच्या भूमिकेत दिसणार ‘बाहुबली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

