नागपूर : खासदार संजय राऊत यांची नागपुरात पत्रकार परिषद झाली असता. ईडीच्या कारवायांबद्दल राऊत म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय. मध्यमवर्गीय व्यक्तीवर आक्षेप घेण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होत आहेत”.
यासह राऊत म्हणाले, राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. शिवसेना ही प्रमुख राजकीय संघटन आहे. संघटन ही शिवसेनेची खरी ताकद आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त शिवसेना देशाच्या राज्यात टिकून आहे. हे मजबूत संघटन आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत आहोत.
येणाऱ्या काळात शिवसेनेने ताकदीनं काम करावं. तसेच ” जिथे शिवसेना लढली नाही तिथंल्या कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागले”. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करावं. यासाठी दौरा आहे. नागपूर विदर्भातील मुख्य शहर आहे. उपराजधानी आहे. येथे आमचा पक्ष आम्ही वाढविणार आहोत. हा अधिकार आम्हाला आहे. जुन्या लोकांना पक्षाशी जोडण्यासाठी आलो आहे, असे सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

