मुंबई: तुम्ही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला अनेकदा बॅटने आग लावताना पाहिलं असेल! पण तुम्ही त्याला बंदुकीतून गोळ्या झाडताना पाहिलंय का? रविवारी मुंबई इंडियन्सने त्यांच्या खेळाडूंच्या मनोरंजनासाठी तीन स्पर्धांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये शूटिंगच्या खेळांव्यतिरिक्त पिकल बॉल चॅलेंज आणि मिनी गोल्फ खेळले गेले. शूटिंग गेममध्ये रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्यात स्पर्धा होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात रोहितने ट्रेंडिंग पुष्पा स्टाईलने एंट्री केली.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला (rohit sharma) संपूर्ण जग ‘हिटमॅन’ या नावाने ओळखते. सुरुवातीला सगळ्यांनाच त्याच्या फलंदाजीचे वेड लागले होते, पण आता त्याचे नेमबाजीचे कौशल्य पाहून लोक त्याच्या शूटिंगचे चाहते झाले आहेत. मुंबई इंडियन्सने (MI) रविवारी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहित शर्माने आपले नेमबाजीचे कौशल्य दाखवले. मुंबईच्या चाहत्यांना तो आवडला आहे.
The opening of MI Arena was a total धमाल event! ????
P.S. You will just love Ro in this video. He was truly in his element. ????????#OneFamily #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/OB1MSXZpkU
— Mumbai Indians (@mipaltan) March 21, 2022
नेमबाजीच्या सामन्यात रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्यात सामना झाला आणि कर्णधाराने मुंबईच्या सर्वात महागड्या खेळाडूचा सहज पराभव केला. रोहित शर्मा पिकल बॉल चॅलेंजरमध्येही खूप पुढे दिसत होता. मात्र, मिनी गोल्फ रेंजमध्ये वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेने सर्वांचा सहज पराभव केला. मुंबईचे खेळाडू स्पर्धा सुरु होण्याआधी प्रॅक्टिस सोबतच मजा मस्ती देखील करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “आता कळेल कॅबिनेट जेलमध्ये जातंय की…”, संजय राऊतांचा भाजपला इशारा
- “त्यांच्या घरामध्ये कोण कोणासोबत झोपतं तो आमचा प्रश्न नाही”; नितेश राणेंचं भलतचं वक्तव्य
- “…तर अजूनही अनिल देशमुखांना पुन्हा गृहमंत्री करता येईल”, भातखळकरांचा राऊतांना खोचक टोला
- Women’s World Cup : शर्यत अजून संपलेली नाही..! भारतानं उडवला बांगलादेशचा धुव्वा; ११० धावांनी दिली मात!
- ‘द कश्मीर फाइल्स’साठी ‘बच्चन पांडे’चे स्क्रिनिंग जबरदस्तीने थांबवले! पहा व्हिडीओ


