मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील आदिश बंगल्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी पालिकेने त्यांना दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे. याविरोधात राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाली असून मुंबई हायकोर्टाने राणेंना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेने राणेंना पाठवलेल्या नोटीशीवर तूर्तास कोणतीही कारवाई नको असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला असून मनपानं पाठवलेल्या नोटिशीवर तूर्त कोणतीही कारवाई नको, असे आदेश दिले आहेत. थोबाड सुजवून घेण्याची ठाकरे सरकारला सवय जडली आहे.”,असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला असून मनपानं पाठवलेल्या नोटिशीवर तूर्त कोणतीही कारवाई नको, असे आदेश दिले आहेत.
थोबाड सुजवून घेण्याची ठाकरे सरकारला सवय जडली आहे. pic.twitter.com/j76AMoDAmu— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 22, 2022
दरम्यान राणेंनी या नोटीशीला उत्तर देताना ते बांधकाम नियमित करण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी घेऊन त्यावर पालिकेने निकाल देणं अपेक्षित आहे. हा निकाल राणेंच्या विरोधात गेल्यास त्यावर तीन आठवडे कोणतीही कारवाई करू नये, जेणेकरून त्या निकालाविरोधात पुन्हा दाद मागण्याचा पर्याय राणेंकडे उपलब्ध राहील, असे हायकोर्टाने निकालात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘द कश्मीर फाइल्स’साठी ‘बच्चन पांडे’चे स्क्रिनिंग जबरदस्तीने थांबवले! पहा व्हिडीओ
- “केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय” – संजय राऊतांची टीका
- भाजप-सेना पुन्हा एकत्र येणे अशक्य; संजय राऊतांचे स्पष्टीकरण
- अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही चूक होती- संजय राऊत
- खेळाडू कधीच नाही विसणार आजचा दिवस; ३० वर्षांपूर्वी एका नियमामुळे गमवावा लागला होता वर्ल्डकप!


