मुंबई : जगभरातील विविध व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडिया क्षणार्धात कोणतीही माहिती व्हायरल होते. या सोशल मीडियावर एखादी व्यक्ति काही मिनिटातमध्ये हीरो होते आणि झीरोही होते. आता एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा रेमडेसिवीर इंजेक्शनला चक्क रेमो डिसूजा बोलत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे अनेकाना आपले हसू आवरता आले नाही.
या व्हिडिओमध्ये एक मुलगा पत्रकाराला बाईट देताना आपला संताप व्यक्त करत रागात बोलण्याच्या भरात रेमडेसिवीरचा उच्चार तो चक्क ‘रेमो डिसूजा’ असा करतो. रेमोने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना रेमोने लिहिले, “शेवट पाहण्यास विसरु नका. सिप्लाचा रेमो डिसूजा. फक्त मनोरंजनासाठी.”
https://www.instagram.com/p/COzfo0dJOJ_/?utm_source=ig_web_copy_link
एका वृत्तवाहिनीने कोरोनाशी संबंधित समस्यांविषयी स्थानिक लोकांना विचारले. त्यावर एका तरूणाने सांगितले की, “या देशात ५०० रुपये अधिकारी लाच घेतात. सीआयपीएलए कंपनीची औषध रेमो डिसूझा ५०० रुपयाला मिळत असताना ते हजारोंमध्ये विकले जाते”, अस या व्हीडोओमध्ये तो मुलगा बोलताना दिसत आहे.
मात्र रेमोने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रीया येत आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना या व्हिडिओवर कमेंट करण्याचा मोह आवरता आलेला नाही. भारती सिंह, अपारशक्ति खुराना, सूरज पंचोली, मनीष पॉल यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. अनेकांची रेमडेसिवीर इंजेक्शनला बोलताना उच्चर चुकीचा होतो. असचं या मुलाच्या बाबतीत संतापाच्या भरात चुकीचा उच्चार निघून गेला असावा, असं काहीजण म्हणत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शहरासाठी २१८ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी उपाय योजना करा, खंडपीठाचे निर्देश
- कोरोना नंतर म्युकरमायकोसीस आजार; प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवण्याचा दृष्टीकोन हवा- आ. निलंगेकर
- मान्सूनपूर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!
- चक्रीवादळाचे रौद्ररूप : केरळातील अनेक घरे जमीनदोस्त, कोकणात समुद्र खवळला
- ‘म्युकरमायकोसिस’चा लातुरात शिरकाव; ५ रुग्ण आढळले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

