🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलिया महिला संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२२ जिंकले आहे. मात्र यात खास कामगिरी करणाऱ्या एलिसा हिलीला सपोर्ट करायला एक खास व्यक्ती मैदानावर उपस्थित होती. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला सपोर्ट करण्यासाठी न्यूझीलँडला पोहोचला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडसमोर ३५७ धावांचा डोंगर उभा केला. ज्यामध्ये स्टार्कची पत्नी एलिसा हिलीने १७० धावांची शानदार खेळी केली. पत्नी एलिसा हिलीच्या शतकापूर्वी मिचेल स्टार्क खूप तणावात दिसला. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये स्टार्क पत्नी एलिसा हिलीच्या (alyysa healy) शतकापूर्वी चिंतेत दिसत होता. डावाच्या ३५ व्या षटकात एलिसा हिली आपल्या शतकापासून फक्त एक धाव दूर होती. ऑस्ट्रेलिया संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टार्क (mitchell starc) स्टँडवर उपस्थित होता. एलिसा हिली ९९ धावांवर फलंदाजी करत होती आणि तिच्या शतकापासून फक्त एक धाव दूर होती. यादरम्यान मिचेल स्टार्कच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता.
एलिसा हिलीचे शतक पूर्ण झाल्यानंतर पती मिशेल स्टार्कने हसत टाळ्या वाजवल्या. हिलीच्या स्फोटक फलंदाजीची जगभरात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे हिलीचे शतक त्याच्यासाठी खास होते कारण हा सामना पाहण्यासाठी स्टार्कही स्टँडमध्ये उपस्थित होता. या सगळ्या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
