मुंबई : काही दिवसात भारतीय पुरुष संघासोबत भारतीय महिला क्रिकेट संघ हा इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात महिला संघाचे प्रशिक्षक पद रमेश पोवार हे सांभाळणार आहे. माजी प्रशिश्रक डब्लू व्ही रमण यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रमेश पोवार हे काही वर्षापुर्वीही भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यावेळी कर्णधार मिताली राज आणि प्रशिक्षक यांच्यात मतभेद झाले होते. २०१८ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतुन भारतीय संघ बाहेर पडल्यावर प्रशिक्षक रमेश पोवार आणि कर्णधार मिताली राज यांच्यात मतभेद झाले होते. या वादानंतर रमेश पोवार यांना प्रशिक्षक पदावरुन दुर करण्यात आले. मात्र पुन्हा त्यांची नेमणुक प्रशिक्षकपदी झाल्याने अनेकांनी अश्चर्य व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलताना ती म्हणाली की,’संघासाठी कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी एकत्र येत काम करणे गरजेचे आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेच्या अनुषंगाने सर्वोत्तम कामगीरी करण्यासाठी पोवार यांची रणनीती आखली आहे. त्यावर काम करणे गरजेचे आहे’ असे मितली म्हणाली. आगामी इंग्लंड दौऱ्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला कसोटी, एकदिवसीय आणि टि-२० मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला ‘या’ कारणामुळे अटक
- आयपीएलच्या घोषणेनंतर जोफ्रा आर्चरचे पुन्हा एकदा जुने ट्विट व्हायरल; राजस्थानने केले रिट्वीट
- चोवीस तासात 40 किमी रस्त्याच्या कामाचा विक्रम; अशोक चव्हाणांनी केले अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
- मोठी बातमी : ‘या’ बँकेचा परवाना आरबीआयने केला रद्द
- अभिनेत्रीच्या मानसिक आणि शारिरीक त्रासला कंटाळून शिवम पाटीलने केली पोलिसात तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

