Share

बेस्ट उपक्रमाला पूर्णवेळ महाव्यवस्थापक द्या; भाजपची जोरदार मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – बेस्ट उपक्रमांमध्ये गेली ५० दिवस महाव्यवस्थापक हे कार्यकारी पद रिक्त असल्याने बेस्टच्या दैनंदिन व धोरणात्मक कामाचे निर्णय होत नसल्याचे निदर्शनास आणून भाजपा बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी सभा तहकुबीची सूचना सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत मांडली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर सभा तहकुबीची सूचना फेटाळून लावल्याने त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

भाजपने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या अनुसार बेस्ट समिती बृहन्मुंबई महानगरपालिकेची संविधानिक समिती असून बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईकरांना सार्वजनिक परिवहन सेवा व वीजपुरवठा या दोन अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येतात. बेस्ट उपक्रमाची वार्षिक उलाढाल ६ हजार कोटींची असून या उपक्रमाचा सेवक वर्ग सदस्यांची संख्या साधारणत: ३७ हजार इतकी आहे. मुंबई शहरामध्ये बेस्ट उपक्रमाचे सुमारे १०.५० लाख वीज ग्राहक आणि ३० लाख बस प्रवासी आहेत. या उपक्रमाच्या सेवा मुंबईकरांना अखंडित व विनाव्यत्यय पुरविण्यात याव्यात याकरिता राज्य शासनाकडून उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असते. मागील ३० वर्षापासून राज्य शासनाकडून  अधिकाऱ्यांची  नियुक्ती होते.

यानुसार १२ एप्रिल २०२१ रोजी उपक्रमाचे तत्कालीन महाव्यवस्थापक  सुरेन्द्रकुमार यांची दिल्ली येथील भारत सरकारच्या अखत्यारीतील गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव पदी नियुक्ती करण्यात आल्याने उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सध्याच्या कोविडमुळे निर्माण झालेल्या महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीत उपक्रमाच्या अत्यावश्यक सेवा अखंडित सुरू राहणे क्रमप्राप्त असताना बृहन्मुंबईच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांना बेस्ट उपक्रमाच्या कामकाजाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी उपक्रमाच्या मुख्यालयास देखील भेट दिलेली नाही. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या मागील दोन बेस्ट समिती सभांना देखील त्यांनी उपस्थिती दर्शवली नाही. केवळ उपक्रमाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात येत असल्याने बेस्ट समितीमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमास पूर्णवेळ कार्यकारी प्रमुख नसणे हे संपूर्ण मुंबईकरांना वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे अशी टीका बेस्ट समिती सदस्य  गणाचार्य यांनी केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक (प्रकल्प) यांच्या बेफिकीर वृत्तीचा व बेस्टचे महाव्यवस्थापक पदावर राज्य शासनाकडून प्रशासकीय सेवेतील अधिकारी महाव्यवस्थापक पदावर नियुक्त करण्यामध्ये दिरंगाई होत असल्याचा  निषेध करत बेस्ट समितीची सभा कोणतेही कामकाज न करता तहकूब  करण्याची मागणी बेस्ट समिती सदस्य  गणाचार्य यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!