नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संकटातही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरूच आहे. कोरोना काळात अफवा आणि संभ्रम पसरवल्याचा आरोप भाजपने काँग्रेसवर केला आहे. देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमा खराब करण्यासाठी काँग्रेस टूलकिटचा वापर करत असल्याचा आरोप भाजप नेते संबित पात्रा यांनी केला आहे.
भाजप नेते आणि मंत्र्यांनी काँग्रेसवर टूलकिटचे आरोप करणारे पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेत. यात काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘Indian Stain’ आणि ‘Modi Strain’ असे शब्द वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यासोबत कुंभ मेळ्यातून कोरोनाचा प्रसार झाल्याचा उल्लेख करण्यास सांगितल्याचा आरोपही भाजपा नेत्यांनी केला आहे. राहुल गांधी रोज करत असलेलं ट्वीटही टूलकिटचा भाग असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. कुंभमेळ्यावर आवर्जून प्रतिक्रिया दिली, पण ईदवर गप्प असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
Toolkits are not alien to the Congress and their eco-system. Infact, a substantial part of their energy goes into making them. Here is a toolkit on the Central Vista…they make one Toolkit of the other every week and when exposed, they "deny" it. #CongressToolkitExposed pic.twitter.com/fsR8VZUOov
— Sambit Patra (@sambitswaraj) May 18, 2021
टूलकिट म्हणजे काय?
जगाच्या वेगवेगळ्या भागात सातत्यानं आंदोलन होत असतात. मग ते अमेरिकेतील black lives matter असो वा लॉकडाउन विरोधी आंदोलन. पर्यावरणाशी निगडित climate strike campaign असो किवा इतर आंदोलन. अशा स्वरूपाची आंदोलन करताना त्याचा एक कृती कार्यक्रम तयार केला जातो. आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर नेणं वा तीव्र करणं करण्याच्या उद्देशानं हे तयार केलं जातं. ज्यामध्ये हा कृती कार्यक्रम नोंदवण्यात येतो, त्याला टूलकिट असं म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनात या टुलकिटचा वापर केल्याचे समोर आले होते.
महत्वाच्या बातम्या
- आंबेडकर म्हणाले ‘वणवण फिरू नका’; फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले..
- ‘केंद्राने दिलेले तकलादू व्हेंटिलेटर सुरू करून दाखवाच’, काँग्रेसचे फडणवीसांना थेट आव्हान
- ‘..तेव्हा कोणत्या बिळात लोळत होतात?, पडळकरांचा काँग्रेसवर पलटवार
- जन्म-मृत्यू एकत्रच! जुळ्या भावांचा कोरोनामुळे सोबतच मृत्यू
- ‘रस्त्यावर लोळणाऱ्यांची आता दातखिळी बसली का?’, भाई जगतापांनी पडळकरांना डिवचले


