Share

आत्मविश्‍वासाने लढा विजय आपलाच; चंद्रकांत पाटलांकडून नगरसेवकांना विश्वास

Published On: 

पुणे : पुणे महापालिकेत सत्तेत आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षात केलेली कामे मतदारांपर्यंत पोचविण्यात कुठेही कमी पडू नका. मेट्रो, पीएमपीची बस खरेदी यासारखी मोठी कामे केवळ आपल्यामुळेच झाली आहेत. महापालिकेच्या पातळीवरदेखील खूप कामे झाली आहेत. त्यामुळे निवडणुकीला आत्मविश्‍वासाने सामोरे जाताना आपण केलेली कामे ठामपणे मतदारांसमोर ठेवा.

आत्मविश्‍वासाने लढा विजय आपलाच आहे.या शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील नगरसेवकांना विश्‍वास दिला. महाआघाडीची एकत्र लढण्याची तयारी एका बाजूला सुरू आहे. दुसरीकडे भाजपने एक‌टयाचा बळावर लढण्याची तयारी सरू केली आहे. भाजपाचे पुण्यात ९९ नगरसेवक आहेत.

पुणे महापालिकेच्या इतिहासात एवढे बहुमत कुणालाच कधी मिळाले नव्हते. या सर्व ९९ नगरसेवकांचे दोन दिवसांचे अभ्यास शिबीर सध्या पुण्यात सुरू आहे. महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पाश्‍र्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपचे दोन दिवसांचे शबीर याच तयारीचा भाग आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!