Share

बीएमसी कारवाईप्रकरणी उच्च न्यायालयाने दिला सोनू सूदला दिलासा !

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत नंतर आता अनधिकृत बांधकाम प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूद विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे

जुहू येथील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डींगचे रुपांतर आवश्यक त्या परवानग्या न घेता केल्यामुळे पालिकेने जुहू पोलीस ठाण्यात सूद विरोधात तक्रार केली आहे. आवश्यक परवानगी न घेता निवासी इमारतीचा व्यावसायिक वापरासाठी बदल केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

सोनू सूदने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात आज सुनावणी घेण्यात आली आहे. न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पालिकेला निर्देश दिले आहेत. दिवाणी न्यायालयानं सोनू सूदला दिलासा देत दिलेले निर्देश पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवले आहेत.

दरम्यान सोनू सूदने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आधीच बीएमसीकडून युझर चेंजसाठी परवानगी घेतलेली आहे आणि सध्या ते महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगी मिळण्याची प्रतिक्षा करत आहेत. तर, या इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असा त्याच्या वकिलांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!