नागपूर : जेष्ठ अभिनेते लेखक वीरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन झाले. सोमवारी मध्यरात्री वीरा साथीदार यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावरती एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचं आयुष्य आरामच असतं.त्यांचं राहणीमान उच्च दर्जाचं असतं हे आपण नेहमीच पाहिलं आहे. त्यातच एखादा चित्रपट सुपरहिट झाला, त्या चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव झाला की त्या चित्रपटातील कलाकाराचं आयुष्य कास पलतट हेही आपण पाहिलं आहे . मात्र एक कलाकार असा आहे की ज्याच्या चित्रपटाला आभाळाएवढं यश मिळालं तरी त्या कलाकाराचं जीवन काही बदललं नाही. या कलाकाराचं नाव आहे वीरा साथीदार.
‘कोर्ट’ या चित्रपटात वीरा साथीदार यांनी भूमिका साकारली होती. कोर्ट या चित्रपटाचा जोरदार डंका वाजला. रसिकांसह अनेक पुरस्कारांनी कोर्ट चित्रपटाचा गौरव झाला. राष्ट्रीय पुरस्कारही कोर्ट चित्रपटाला मिळाला. मात्र इतके पुरस्कार मिळूनही वीरा साथीदार यांच्या जीवनात काही बदल झालेला नाही.
महत्वाच्या बातम्या
- देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती
- रेमेडेसिवीर ‘व्हेंटिलेटर’ वर! इंजेक्शनचा साठा उपलब्ध राहील, असे नियोजन करा: पालकमंत्री टोपे
- ‘बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शाह राजीनामा देणार का ?’
- दिपक हुडाच्या अर्धशतकानंतर होतोय कृणाल पांड्या होतोय ट्रोल
- जालन्यात बाजारपेठ हाऊसफुल; दागिने, कपडे खरेदीला प्राधान्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

