औरंंगाबाद : वाहन चोरट्यांनी शहर परिसरात धुमाकुळ घातला असून चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून एका बुलेटसह अर्धा डजन दुचाकी लंपास केल्या आहेत.
शेख जुबेर शेख चाँद (वय २३,रा.हमालवाडा,रेल्वेस्टेशन परिसर) यांची बुलेट क्रमांक (एमएच-२०-एफए-४७८६) चोरट्याने १८ जून रोजी घराजवळून चोरून नेली. शेख जमीर शेख जहरूद्दीन (वय ३७,रा.मोतीकारंजा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीझेड-२८८७) चोरट्याने १६ मे रोजी जामा मशिदजवळून चोरून नेली.
अन्वर खान अब्दुल रहेमान खान (वय ४०,रा.शादाबनगर,मिटमिटा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीयू-१७९९) चोरट्याने २१ जून रोजी घराजवळून चोरून नेली. अप्पासाहेब प्रल्हाद चव्हाण (वय ३३,रा.पिसादेवी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईटी-०६८१) चोरट्याने २१ जून रोजी कडा ऑफीस समोरून चोरून नेली. चंद्रभान सुर्यभान वाहुळ (वय ४१,रा.नारेगाव) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीएफ-३४४२) चोरट्याने २० जून रोजी एपीआय कॉर्नरजवळून चोरून नेली. मििंलद प्रल्हाद मगरे (वय ३२,रा.जहागिरदार कॉलनी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईएन-३२६९) चोरट्याने २० जून रोजी घराजवळून चोरून नेली.
शहराच्या विविध भागातून तब्बल अर्धा डजन दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे सातारा, सिटीचौक,छावणी, पुंडलिकनगर,एमआयडीसी सिडको,वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूने दिला राजिनामा
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार


