Share

लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात

Published On: 

औरंगाबाद : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या प्रादूर्भावामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे बहुतांश आर्थिक व्यवहार ठप्प आहे. याचा मोठा फटका सध्या हातावर पोट असणाऱ्या लोकांना बसत आहे. अत्त्यावश्यक सेवेत असणारा भाजीपाला विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. शहरात आणि जिल्ह्यात आठवडी बाजारात बसून माळवं विकणा-यांना आता माळवं विकायचं कस? असा प्रश्न भेडसावत आहे. अत्त्यावश्यक सेवा सुरू असल्या तरी त्या केवळ सकाळी ७ ते ११ यावेळेतच सुरू ठेवण्यास परवाणगी देण्यात आली आहे खरी, मात्र या ४ तासांत माळवं विक्री होत नसल्याने माळवं उत्पादकांवर हे माळवं फेकून देण्याची वेळ रोज येत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसानीला तोंड देणाऱ्या माळवा उत्पादकांनी या माळवा विक्रीसाठी वेगळी सोय करण्याची मागणी जोर धरत आहे.

यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतक-यांनी कोथिंबिर, पालक, मेथी, शेपू, वांगे, भेंडी अशा भाज्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले आहे. त्यातच या माळव्याला खताची गरज भासत नसल्याने कमी खर्चात अधिक उत्पादन मिळत आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात माळव्याचे उत्पादन होत आहे. मात्र, आता अचानक आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संचारबंदी लागली असून माळवा उत्पादक शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे कवडीमोल भावात माळवा विकावा किंवा रस्त्यात फेकून द्यावा एवढे दोनचा पर्याय त्यांच्या पुढे उरलेले असल्याने नेमके जगायचे तरी कसे असा प्रश्न माळवा उत्पादक शेतक-यांना पडला आहे.

संचारबंदीमुळे संपूर्ण ठिकाणांवरील आठवडे बाजार तसेच सर्व भाजीपाला लिलाव बंद झाले असून वाहनांवरही निर्बंध आणल्यामुळे भाजीपाल्याची वाहतूकही बंद झाली आहे. ग्राहकच नसल्याने होलसेल व्यापारीही भाजीपाला घेण्यास धजावत नसल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतक-यांचा भाजीपाला जागेवरच सडून जात असल्याचे चित्र आहे. तर काही शेतकरी भाजीपाला घेऊन शेतालगतच्या रस्त्यावर कोणीतरी ग्राहक येईल या आशेने बसत आहेत. कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, तर कधी कोरड्या दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीस आलेला असतांनाच नव्याने उमगलेल्या कोरोना आजाराने त्यात भर घातली आहे.. अनेक ठिकाणी आठवडी बाजार बंद असल्याने हे माळवं पडून राहिल्याने खराब झाले आहे. तर विकायला आणलेला अर्धाअधिक माळवा घरी नेऊनही करायचे काय या प्रश्नाने चिंतातून झालेला शेतकरी ११ वाजे नंतर केवळ हिरवा पाला म्हणून या माळव्याला रस्त्यावर टाकून देत हताश मनाने घरचा रस्ता पकडत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

 महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!